आरापूर औद्योगिक क्षेत्राच्या भूसंपादनाला मिळाली गती
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : शहराजवळील प्रस्तावित आरापूर औद्योगिक क्षेत्राच्या भूसंपादनाला आता मोठी गती मिळण्याची शक्यता आहे. या क्षेत्रासाठी जमिनीच्या मोबदल्याचा महत्त्वाचा दर प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्या, जमिनीचे भौगोलिक स्थान आणि वाढत्या औद्योगिक गरजांचा गांभीर्याने विचार करून जिल्हाधिकाऱ्यांनी
प्रतिहेक्टरी किमान १ कोटी १२ लाख ५० हजार रुपये दराची शिफारस या प्रस्तावात केली आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास भूसंपादनाचा मार्ग मोकळा होणार आहे.
अतिरिक्त वाळूज औद्योगिक
७६२ हेक्टर जमिनीचे होणार भूसंपादन
गंगापूर तालुक्यातील सुलतानाबाद, आरापूर आणि गवळी शिवरा या तीन गावांमधील ७५२.४३ हेक्टर खाजगी आणि २.६० हेक्टर सरकारी अशी एकूण ७६२.०९ हेक्टर जमीन या नियोजित औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केली जाणार आहे.
वसाहतीसाठी शासनाने आरापुरा, गवळी शिवरा व सुलतानाबाद या तीन गावांमधील ७५२.४३ हेक्टर खाजगी आणि ९.६० हेक्टर सरकारी अशी एकूण ७६२.०९ हेक्टर क्षेत्र औद्योगिक क्षेत्र म्हणून जाहीर केले
आहे. सुमारे ९० टक्के मोजणी झाली. मात्र, जमिनीच्या दरावरुन भूसंपादन खोळंबले आहे. दरम्यान, ३० जून २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जमीन मालकांनी/शेतकऱ्यांनी कमी
दराला विरोध दर्शवत एकरी १ कोटी ते १.५० कोटी रुपये दराची मागणी केली होती. मात्र, शेतकऱ्यांचा विरोध अन् वाढीव मोबदल्याची मागणी आणि वाढता औद्योगिक विकास लक्षात घेता प्रतिहेक्टरी १ कोटी १२ लाख ५० हजार या दराची शिफारस एमआयडीसी वरिष्ठ कार्यालयाकडे केली आहे. प्रतिहेक्टरी १ कोटी १२ लाख ५० हजार या दराच्या प्रस्तावावर अंतिम निर्णयासाठी तो समितीसमोर ठेवण्याची विनंती जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांनी केली आहे.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions













